CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माही भाई…”

WhatsApp Group

Ruturaj Gaikwad IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्ज संघ नवीन कर्णधारासह आयपीएल 2024 मध्ये प्रवेश करेल. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत आता चेन्नईने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला आपला नवा कर्णधार बनवले आहे. गायकवाड प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. कर्णधार झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असा विश्वास ऋतुराज गायकवाडला वाटत असला, तरी संघात महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे त्याचे काम सोपे होईल, असे त्याला वाटते.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्याच्या एक दिवस आधी, धोनीने गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले. चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड म्हणाला, ”हा खूप मोठा सन्मान आहे. शिवाय, ही एक मोठी जबाबदारी आहे पण आमच्याकडे ज्या प्रकारचा संघ आहे, ते पाहता मी खूप उत्साहित आहे. प्रत्येकजण अनुभवी आहे आणि त्यामुळे माझ्याकडे करण्यासारखे फारसे काही नाही.”

”मला काळजी करण्याची गरज नाही”

ऋतुराज गायकवाडच्या मदतीसाठी धोनी सदैव तत्पर असेल. त्याच्याशिवाय त्याला जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांचीही मदत मिळेल. गायकवाडच्या मते, ”याशिवाय माही भाई टीममध्ये आहे. मला मार्गदर्शन करण्यासाठी जड्डू भाई आणि अज्जू भाई (रहाणे) देखील संघात आहेत. त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही. या नव्या भूमिकेचा आनंद घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

हेही वाचा – VIDEO : कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला!

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. तो 2020 पासून चेन्नईसोबत आहे. गायकवाडने आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने 1797 धावा केल्या आहेत. गायकवाडच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकं आहेत. नाबाद 101 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 27 वर्षीय सलामीवीर गायकवाड आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपधारकही आहे. संघाला शानदार सुरुवात देण्याची जबाबदारी गायकवाड यांच्या खांद्यावर आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment