

IPL 2024 | फेब्रुवारी महिन्यापासून हायटेक सिटी बंगळुरूला जलसंकटाचा सामना करावा लागला आहे. येथील परिस्थिती अशी आहे की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातही पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबावर लाखो लोक अवलंबून आहेत. पण या सगळ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) संदर्भात तणाव वाढला आहे.
BCCI ने IPL 2024 च्या हंगामातील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या कालावधीत बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 सामने होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात 25 मार्च रोजी पहिला सामना खेळवला जाईल.
मात्र त्याआधीच शहरात निर्माण झालेल्या जलसंकटामुळे सामना होणे कठीण दिसत आहे. दरम्यान, येथील सामने अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, केएससीएने स्पष्ट केले आहे की, जलसंकटाचा आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यांवर परिणाम होणार नाही, कारण स्टेडियमच्या सीवेज प्लांटमधील पाणी मैदानाच्या आऊटफिल्ड आणि खेळपट्टीसाठी वापरले जाईल.
केएससीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेंदू घोष म्हणाले, ‘सध्या आम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. पाणी वापराबाबत राज्य सरकारकडून माहिती मिळाली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत आम्ही सातत्याने बैठका घेत आहोत.
हेही वाचा – “अशा कायद्याची काय गरज?”, साऊथ सुपरस्टार थलपती विजयचा CAA ला विरोध!
दुसरीकडे, बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ (BWSSB) ने नोटीस जारी केली होती, बागकाम किंवा वाहने धुणे यासारख्या इतर कोणत्याही कारणासाठी पिण्यायोग्य पाणी वापरण्यास मनाई केली होती. पण घोष यांना विश्वास आहे की ते सीवेज प्लांटमधील पाणी वापरतील, जे सध्या पुरेसे आहे.
ते म्हणाले, ”आम्ही एसटीपी प्लांटचे पाणी आऊटफिल्ड, खेळपट्टी आणि इतर कामांसाठी वापरत आहोत. सामन्यासाठी 10 ते 15 हजार लिटर पाण्याची गरज भासू शकते. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही ते एसटीपी प्लांटद्वारे पूर्ण करू. त्यासाठी भूजलाचा वापर करावा लागणार नाही.”
वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!