

RCB vs PBKS IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १८ वर्षानंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळताना आरसीबीने फायनलमध्ये पंजाबला ६ धावांनी हरवले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. विराट कोहलीच्या ४३ धावांच्या जोरावर आरसीबीने २० षटकात ९ बाद १९० धावा उभारल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून शशांक सिंगने ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ६१ धावांची झुंज दिली पण त्यांना २० षटकात ७ बाद १८४ धावांपर्यंतच जाता आले. कॅप्टन श्रेयस अय्यरचे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीचे आणि पंजाबच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाचेही स्वप्न धुळीस मिळाले.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 #𝐓𝐀𝐓𝐀𝐈𝐏𝐋 𝟐𝟎𝟐𝟓 🏆🤩
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
The ROYAL CHALLENGERS BENGALURU have done it for the first time ❤#RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/x4rGdcNavS
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन):
फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!