

Ashwani Kumar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा २३ वर्षीय गोलंदाज अश्वनी कुमारने केकेआरविरुद्धच्या सामन्यात विक्रमी कामगिरी केली. या सामन्यापूर्वी हे नाव कोणालाही माहिती नव्हते, पण आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्वनी रातोरात स्टार बनला आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अश्वनीने क्रिकेटच्या उंचीवर पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले. लिलावात मुंबई इंडियन्स संघाने त्याला ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले आणि त्याला स्टार बनवले.
इंडियन एक्सप्रेसने त्याचे वडील हरकेश कुमार यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, ‘पाऊस असो किंवा ऊन असो, अश्वनीने मोहालीतील पीसीए किंवा नंतर मुल्लानपूरमधील नवीन स्टेडियममध्ये जाण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. कधीकधी, तो पीसीए अकादमीला सायकलने जायचा किंवा शेअर ऑटोने जायचा. मला आठवतंय की तो माझ्याकडून भाड्यासाठी ३० रुपये घेत असे आणि जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले तेव्हा मला माहीत होतं की प्रत्येक पैशाची किंमत आहे.’
Debut straight out of a storybook 📖
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
The perfect first chapter for Ashwani Kumar 👌👌
Updates ▶ https://t.co/iEwchzDRNM#TATAIPL | #MIvKKR | @mipaltan pic.twitter.com/npaynbIViX
ते पुढे म्हणाले, ‘आज प्रत्येक विकेटनंतर, मला त्या दिवसांची आठवण येते जेव्हा तो रात्री १० वाजता सरावानंतर परतायचा आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता बाहेर जायचा.’ अश्वनी चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून झालेल्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरला, तो नेहमीच जसप्रीत बुमराह आणि मिचेल स्टार्क यांना आपले आदर्श मानत असे. आयपीएल २०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी बुमराहच्या जागी त्याला जबाबदारी देण्यात येईल हे या वेगवान गोलंदाजाला अजिबात माहिती नव्हते.
अश्वनीचा भाऊ म्हणाला, ‘त्याला नेहमीच जसप्रीत बुमराह आणि स्टार्कसारखे व्हायचे होते. त्याच्या मित्रांनी त्याला क्रिकेट बॉल घेण्यासाठी पैसे गोळा केले आणि जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले, तेव्हा त्याने पहिले काम केले ते म्हणजे आमच्या गावाजवळील अकादमींना क्रिकेट किट आणि बॉल वाटले. तो मला नेहमी म्हणायचा की त्याची आवडती जर्सी त्याच्या नावाची असेल. आजच्या कामगिरीने त्याने हे सुनिश्चित केले आहे की मुले त्याच्या नावाची जर्सी घालतील.’
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!