

Vaibhav Suryavanshi : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास रचला आहे. त्याला ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या जबरदस्त कामगिरीसह, त्याला १० लाख रुपये आणि टाटाची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा कर्व्ह कार बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
बिहारचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीचा हा आयपीएलमधील पहिलाच हंगाम होता, परंतु त्याने आपल्या स्फोटक कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने राजस्थान रॉयल्ससाठी अनेक वादळी खेळी केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Vaibhav Suryavanshi won a Tata Curvv
— The Royal Rage 𝕏 Juice Bottler 🔥 (@JuiceBottler) June 3, 2025
but not qualified for a license yet 😂 pic.twitter.com/OWWZXpVmw7
२८ एप्रिल रोजी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३८ चेंडूत १०१ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत वैभवने ११ षटकार आणि ७ चौकार मारले. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. त्याने सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजाचा विक्रमही केला, जो यापूर्वी युसूफ पठाणच्या नावावर होता.
वैभव सूर्यवंशी या हंगामात एकूण सात सामने खेळला. या सामन्यांमध्ये त्याने २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. इतक्या लहान वयात इतकी जबरदस्त कामगिरी पाहून चाहते आणि क्रिकेटमधील दिग्गजही त्याचे चाहते झाले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!