

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. टीम इंडिया नवा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई या भारतीय गोलंदाजांसमोर आयर्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यांनी भारतीय संघाला 140 धावांचे आव्हान दिले आहे.
आयर्लंडचा डाव
प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची अवस्था खराब झाली. 11 महिन्यानंतर कमबॅक करत असलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे अँड्र्यू बालबर्नी आणि लॉर्कन टकरला बाद केले. सुंदर चेंडू टाकत बुमराहने बालबर्नीची (4) दांडी गुल केली. तर टकरला (0) संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर पदार्पणवीर प्रसिध कृष्णा, रवी बिश्नोई यांनी हादरे देत आयर्लंडची अवस्था 6 बाद 59 अशी केली. पण कर्टिस कॅम्फर आणि बॅरी मॅककार्थीने जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी संघाला शतकापार पोहोचवले. कॅम्फरने 3 चौकार आणि एका षटकारासह 39 धावा केल्या. अर्शदीप सिंगने त्याला बाद केले. मॅककार्थीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 51 धावा केल्या. आयर्लंडने 20 षटकात 7 बाद 139 धावा केल्या. भारताकडून बुमराह, कृष्णा, बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हेही वाचा – VIDEO : जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक, आयरिश फलंदाजांची उडवली दाणादाण!
दोन्ही संघांची Playing 11
भारत – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कप्तान), रवी बिश्नोई.
आयर्लंड – पॉल स्टर्लिंग (कप्तान), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!