VIDEO : जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक, आयरिश फलंदाजांची उडवली दाणादाण!

WhatsApp Group

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराहने 11 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये धमाकेदार कमबॅक करत आपण अजूनही जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे. बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची अवस्था खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे अँड्र्यू बालबर्नी आणि लॉर्कन टकरला बाद केले. सुंदर चेंडू टाकत बुमराहने बालबर्नीची (4) दांडी गुल केली. तर टकरला (0) संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. पहिल्या षटकात बुमराहने 4 धावा दिल्या.

हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी ‘या’ ठिकाणाहून लढणार लोकसभा निवडणूक!

टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत पाच टी-20 सामने खेळले गेले आहेत आणि यादरम्यान भारताने पाचही सामने जिंकले आहेत. यावेळी जिंकणे आयर्लंडसाठी सोपे नसेल. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कप्तान), रवी बिश्नोई.

आयर्लंड – पॉल स्टर्लिंग (कप्तान), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment