IRE vs IND 1st T20 : कप्तान बुमराहने जिंकला टॉस! रिंकू सिंहसोबत ‘या’ खेळाडूचं पदार्पण

WhatsApp Group

IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. डब्लिनमध्ये रंगणाऱ्या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताकडून रिंकू सिंह आणि प्रसिध कृष्णा पदार्पण करत आहेत.

टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत पाच टी-20 सामने खेळले गेले आहेत आणि यादरम्यान भारताने पाचही सामने जिंकले आहेत. यावेळी जिंकणे आयर्लंडसाठी सोपे नसेल. विशेष म्हणजे टीम इंडिया जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. ही आयर्लंडसाठी चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी ‘या’ ठिकाणाहून लढणार लोकसभा निवडणूक!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कप्तान), रवी बिश्नोई.

आयर्लंड – पॉल स्टर्लिंग (कप्तान), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment