IRE vs IND 2nd T20 : आयर्लंडने जिंकला टॉस..! पाहा दोन्ही संघांची Playing 11

WhatsApp Group

IRE vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि आयर्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. डब्लिन येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आयर्लंडचा कप्तान पॉल स्टर्लिंगने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. टीम इंडियाने डकवर्थ आणि लुईस (DLS) नियमानुसार आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना 2 धावांनी जिंकला. भारतीय संघ आज जिंकला तर मालिकेवर कब्जा करेल. तर आयर्लंडचा संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारत आणि आयर्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 6 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. आज जर आयर्लंडने विजय मिळवला तर भारताविरुद्धचा हा त्यांचा पहिला आणि ऐतिहासिक विजय असेल.

हेही वाचा – ‘येथे’ पाहा चांद्रयान-3 चे लँडिंग LIVE..! इस्रोने सांगितली बदललेली नवीन वेळ

दोन्ही संघांची Playing 11

भारत – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीद कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कप्तान), रवी बिश्नोई.

आयर्लंड – पॉल स्टर्लिंग (कप्तान), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment