

Jay Shah On Rohit Sharma Future : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सध्याच्या WTC 2023-25 सायकल तसेच 2025 मध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती केली आहे. शाह यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये याची घोषणा केली आहे. जय शाह म्हणाले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही ट्रॉफी जिंकू, असा मला विश्वास आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. त्याचवेळी, रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर 2021 मध्ये त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. 2022 मध्ये भारत आशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये हरला होता. मात्र भारताने 2023 चा आशिया कप जिंकला.
JAY SHAH'S OFFICIAL STATEMENT:
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2024
– "I am confident that under the captaincy of Rohit Sharma, we will win the CT & WTC". [ANI] pic.twitter.com/vB8biynM4j
हेही वाचा – नारळाच्या उत्पन्नात भागत नव्हतं म्हणून सुरू केली कोकोची शेती, आज कमावतायत लाखो!
एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभवानंतर जय शाह यांनी संघाचा बचाव केला होता. आणि टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाची भविष्यवाणी केली. 2023 एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील पराभवाच्या निराशेने संघाला यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये इतिहास रचण्याची प्रेरणा दिली.
शाह म्हणाले की, टी-20 विश्वचषकातील विजय मला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर 2023 मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण चषक जिंकू शकलो नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!