करोडोंचा मालक असलेला रोनाल्डो कोणता फोन वापरतो? व्हायरल होतोय ‘हा’ Photo!

WhatsApp Group

Cristiano Ronaldo Phone : पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात चाहते आहेत. फुटबॉलमध्ये रस नसलेल्या लोकांनाही रोनाल्डोचे नाव चांगलेच माहीत आहे. रोनाल्डोची भारतातही खूप क्रेझ आहे आणि या खेळाडूला खूप फॉलो केले जाते. दरम्यान, रोनाल्डोचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे हा फुटबॉलपटू कोणता फोन वापरतो असा अंदाज लावला जात आहे.

सिना डिजिटल ने चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की रोनाल्डो Huawei चा फोन वापरत आहे आणि हा फोन Huawei Mate RS Porsche Design Edition आहे.

हेही वाचा – सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! एका महिन्यात पैसे डबल; पोस्ट ऑफिसच्या ‘या’ भन्नाट योजनेविषयी वाचा!

know here which phone does footballer Cristiano Ronaldo use
रोनाल्डो

 

Weibo चा हा फोटो २०२१ मधला असल्याची माहिती मिळाली आहे आणि काही लोक असेही म्हणतात की फोन मध्ये दिसणारा फोन Huawei चा नाही. याशिवाय रोनाल्डो ८ मोबाईल फोन वापरतो आणि नेव्हिगेशनसाठी तो Huawei मॉडेल वापरतो असाही अनेकांचा दावा आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये रोनाल्डो पोर्श कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्या समोरच्या होल्डरमध्ये फोन ठेवला आहे.

know here which phone does footballer Cristiano Ronaldo use
Mate RS Porsche Design Edition

 

Mate RS Porsche Design Edition २०१८ मध्ये Porsche स्पोर्ट्स कारच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त लॉन्च करण्यात आली आहे. Porsche 911nGT 3 RS देखील त्याच वेळी सादर करण्यात आला. Huawei ने Porsche सोबत भागीदारी केली आणि कारसाठी कस्टमाइझ केलेली Huawei Mate RS वर्धापनदिनानिमित्त रिलीज केले होते. त्यामुळे कारच्या खरेदी पॅकेजचा भाग म्हणून पोर्शे कस्टमाइज्ड Huawei Mate RS देखील देऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment