

Lionel Messi in Kerala : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुढील वर्षी एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतात येणार आहे. त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना केरळ दौऱ्यावर जाणार आहे. हा सामना जून किंवा जुलैमध्ये खेळवला जाईल. मात्र हा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळवला जाईल हे सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी मेस्सी 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता.
मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देईल, असे केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुरहिमन यांनी बुधवारी सांगितले. अब्दुरहिमान पुढे म्हणाले की, हा सामना राज्य सरकारच्या संपूर्ण देखरेखीखाली होणार आहे.
BREAKING🚨 Lionel Messi led Argentina team set to play a friendly in Kerala, announces Sports minister of Kerala#Messi #IndianFootball pic.twitter.com/OBFa8hBUSp
— IFTWC – Indian Football (@IFTWC) November 20, 2024
मेस्सी 2011 मध्ये भारतात आला होता. मेस्सीसह अर्जेंटिना फुटबॉल संघ शेवटचा 2011 मध्ये व्हेनेझुएला विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात आला होता. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील हा सामना 2 सप्टेंबर रोजी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मेस्सीच्या सहाय्याने निकोलस ओटामेंडीने उत्तरार्धात हेडरवर गोल करत अर्जेंटिनाला 1-0 असा विजय मिळवून दिला.
अर्जेंटिना सध्याचा विश्वविजेता आहे. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक फायनलमध्ये पेनल्टी शूट-आऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून संघाने विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाने यापूर्वी 1986 मध्ये विजेतेपद मिळवले होते. अर्जेंटिनाचे हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले. 1978 मध्ये संघ प्रथमच विश्वविजेता बनला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!