

Snake In Mitchell Johnson’s Hotel Room : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. तो या स्पर्धेतील इंडिया कॅपिटल्स संघाचा भाग आहे, परंतु याचदरम्यान त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. मिचेल जॉन्सन लखनऊमधील ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या खोलीत साप आढळून आला आहे. खुद्द जॉन्सननेच सापाचा फोटो शेअर करताना ही माहिती दिली आहे.
मिचेल जॉन्सननं मंगळवारी (१९ सप्टेंबर) त्याच्या हॉटेलच्या कॅमेऱ्यात सापडलेल्या सापाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. या फोटोसोबत त्यानं चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. ”हा कोणता साप आहे हे कोणाला माहीत आहे का? तो माझ्या रूमच्या गेटबाहेर लटकलेला आढळला”, असं जॉन्सननं म्हटलं.
हेही वाचा – धोनी, कोहलीची पूजा करणं बंद करा..! गौतम गंभीरचं वक्तव्य ठरणार वादग्रस्त?
मिचेल जॉन्सनच्या पोस्टवर त्याच्या सहकारी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रेट लीनं कॉमेंट बॉक्समध्ये इमोजी शेअर केला. त्याचबरोबर सुप्रसिद्ध बॉक्सर डॅनी ग्रीननं या सापाचे वर्णन ट्राऊजर साप असे केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज व्हर्नन फिलँडरनेही जॉन्सनच्या पोस्टवर इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे या घटनेवर हॉटेल व्यवस्थापनानं काही कारवाई केली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जॉन्सननं भारताच्या टी-२० विश्वचषक संघाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, ”भारतीय संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज असायला हवा होता. मोहम्मद शमीला भारतीय संघात ठेवण्यात आलेलं नाही. त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आहे. ही एक मोठी चूक असू शकते.”