IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू! पहिलीच मॅच खेळणाऱ्या बॉलरची कमाल, पाहा Video

WhatsApp Group

Fastest Ball Of IPL 2024 | लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना अटल बिहारी व्यापेयी एकना स्टेडियमवर रंगला. लखनऊकडून केएल राहुलच्या जागी निकोलस पूरनने कर्णधारपद सांभाळले. या सामन्यात लखनऊने वेगवान गोलंदाज मयंक यादवला (Mayank Yadav) आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. मयंकनेही संधीचे सोने करत सर्वांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले. मयंकने या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकला.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मयंकने ताशी दीडशेच्या वेगाने गोलंदाजी केली. त्याने एक चेंडू 155.8 किमी प्रतितास या वेगाने टाकला. त्याची गती पाहून सर्वजण थक्क झाले. मयंकला त्याची पहिली आयपीएल विकेट जॉनी बेअरस्टोच्या रुपात मिळाली. मयंकच्या वेगवान चेंडूच बेअरस्टो फसला, मार्कस स्टॉइनिसने त्याची कॅच घेतली. बेअरस्टोने 29 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 42 धावांची खेळी केली. मयंकने या सामन्यात 4 षटकात 27 धावा देत 3 विकेट्स काढल्या. त्याने बेअरस्टोव्यतिरिक्त प्रभसिमरन सिंह आणि जितेश शर्मा यांना बाद केले.

लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 2023 च्या लिलावात त्याच्या मूळ किंमती म्हणजेच 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. त्याला गेल्या मोसमात पदार्पण करण्याची संधी मिळाली नसली तरी 2024 च्या मोसमाच्या सुरुवातीलाच त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मयंक यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 10 सामने खेळताना 12 विकेट घेतल्या आहेत. आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत मयंकने 17 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-2024 च्या उपांत्य फेरीत दिल्लीकडून खेळताना त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, पण संघाला अंतिम फेरीत नेऊ शकला नाही.

हेही वाचा – कॉलेजच्या विद्यार्थ्याला इनकम टॅक्सची नोटीस, कारण कळल्यावर धक्काच बसला!

नाणेफेक करण्यासाठी आला, त्याने सांगितले की दुखापतीतून परतल्यामुळे राहुलला ब्रेक दिला जात आहे, परंतु तो या सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात एलएसजीने आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या 2 खेळाडूंना संधी दिली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment