VIDEO : खळबळजनक! युवराजच्या वडिलांचा धोनीवर गंभीर आरोप; म्हणाले…

WhatsApp Group

Yograj Singh On MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या एका खास संवादाचा जुना व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते ‘माझे रक्त अजूनही उकळत आहे’ असे म्हणताना दिसत आहेत. विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीने जाणूनबुजून चांगली फलंदाजी केली नाही ज्यामुळे भारताचा किवी संघाकडून पराभव झाला. इतर कोणत्याही कॅप्टनकडून भारताला विश्वचषकाचे जेतेपद मिळवून द्यायची त्याची कधीही इच्छा नव्हती.

ते म्हणाले, ”रवींद्र जडेजा एका बाजूने जबरदस्त धैर्य दाखवत होता आणि भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत होता, तर धोनी त्याच्या क्षमतेनुसार खेळत नव्हता. जर धोनी त्याच्या क्षमतेच्या 40 टक्केही खेळला असता तर आम्ही 48व्या षटकातच सामना जिंकू शकलो असतो.”

हेही वाचा – खराब गाडी मिळालेल्या ग्राहकाला 42 लाखांची भरपाई, सुप्रीम कोर्टाचा ‘फोर्ड’ला दणका!

ते म्हणाले, ”लॉजिकवर बोलूया. जडेजा फलंदाजी करत होता तेव्हा तीच गोलंदाज आणि तीच विकेट होती. तो सतत षटकार आणि चौकार मारत होता आणि हा धोनी पंड्याला बोललत होता तू मार. त्याने दोन फलंदाज बाद केले. जर जडेजा येऊन खेळू शकला असता आणि तोही खेळला तर आपण 48 षटकांतच सामना जिंकला असता.”

उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनी 49व्या षटकात 50 धावांवर धावबाद झाला. शेवटच्या शेपटीच्या फलंदाजांना 24 धावा करायच्या होत्या, पण ते अपयशी ठरले. किवी संघाने दिलेल्या 239 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांवर गारद झाला. त्यामुळे या रोमांचक सामन्यात भारतीय संघाला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

सीएसकेकडून खेळलेल्या धोनीच्या खेळीचाही योगराज यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ”जेव्हा तो CSK कडून खेळतो तेव्हा तो 15 चेंडूत 40 धावा करतो आणि 20 चेंडूत 50 धावा करतो. दरम्यान, तो जबरदस्त षटकार आणि चौकारही मारतो.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment