

MS Dhoni Likes Smoking Hookah : महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याचे फॅन फॉलोइंगही जगभरात करोडोंच्या संख्येत आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर जॉर्ज बेलीने धोनीबाबत मोठा दावा केला आहे. वास्तविक, जॉर्ज म्हणतो की धोनीला हुक्का ओढायला खूप आवडते.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने क्रिकेट डॉट कॉम एयूला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की धोनीला हुक्का पिणे खूप आवडते. त्याची खोली प्रत्येक खेळाडूसाठी खुली होती. आम्ही जेव्हा कधी त्याच्या खोलीत जायचो तेव्हा एक ना एक तरुण खेळाडू तिथे नक्कीच दिसायचा. त्याने त्याच्या खोलीत हुक्क्याचा संपूर्ण सेटअप केला होता.
हेही वाचा – धूम मचाले..! मार्केट हादरवण्यासाठी येतेय नवीन Pulsar NS200; जाणून घ्या किंमत!
MS Dhoni bonded with young cricketers over hookah: George Bailey pic.twitter.com/ewkRgwVX02
— Cricpidia (@cricpidia) October 1, 2018
बेली पुढे म्हणाला की, धोनी असे करायचा जेणेकरून खेळाडू मोकळेपणाने बोलू शकतील आणि अंतर कमी करू शकतील. सीएसकेसाठी एक हंगाम खेळला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्सचाही तो भाग होता. जॉर्ज बेलीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
हेही वाचा – धूम मचाले..! मार्केट हादरवण्यासाठी येतेय नवीन Pulsar NS200; जाणून घ्या किंमत!