

मुंबई : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याच्या मजेदार विनोदांसाठी ओळखला जातो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, तो नेहमीच काही ना काही करत राहतो. यावेळी त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्याशी लाइव्ह इन्स्टाग्राम चॅट केलं. ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार सध्या त्रिनिदाद, वेस्ट इंडिजमध्ये आहेत. येथेच त्याच्या हॉटेलच्या खोलीतून पंतनं प्रथम रोहित आणि सूर्यकुमार यांना इंस्टाग्रामवर थेट व्हिडिओ कॉल केला. ते आपापसात गप्पा मारत होते, तेव्हा पंतनं साक्षी धोनीला कॉल केला.
धोनीसोबत व्हिडिओ कॉल..
साक्षीनं कॉल अटेंड केला आणि बोलू लागली. यादरम्यान कॅमेरा धोनीकडे वळला. धोनीनं सुरुवातीला हात जोडून कॅमेरासमोर येण्यास नकार दिला, पण काही वेळानं तो लाइव्ह चॅटमध्येही आला. माहीनंही साक्षीसारखं हॅलो म्हटलं. या दरम्यान पंत म्हणाला, ”भैय्या को थोडी देर लाइव्ह रखो” सुमारे अडीच लाख लोक हा लाइव्ह व्हिडिओ पाहत होते. धोनी या लाईव्ह सेशनमध्ये थोड्या वेळासाठी दिसल्याने चाहत्यांना अचानक धक्का बसला.
🎥 Of The Year 🥺
Glimpse Of Mahi Bhai From Rishabh Pant's Instagram Live ❤️@msdhoni @ChennaiIPL#MSDhoni #MSD #THALA pic.twitter.com/Uj9tA3ylX9— MS Dhoni Fans Club – W.B (@wbmsdian07) July 26, 2022
ऋषभ पंतचं हे बोलणं ऐकून धोनीनं फोन हिसकावला आणि कॉल डिस्कनेक्ट केला. यादरम्यान ऋषभ पंत, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव जोरदार हसायला लागले. ऋषभ पंतच्या या मस्तीमुळं सगळेच इतके नाराज झाले की, बेडवर पडलेल्या रोहित शर्मालाही म्हणावं लागलं, ”मत कर यार ऋषभ.” युझवेंद्र चहलही काही काळ या लाइव्ह सेशनमध्ये होता.
Rohit, Pant, Surya, Chahal doing Instagram live. pic.twitter.com/k5KY6zIx32
— Johns. (@CricCrazyJohns) July 26, 2022
४१ वर्षीय महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर फारच कमी सक्रिय असतो. त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले जातात ज्यामध्ये तो देखील दिसतो. धोनीची चाहत्यांना एक झलक हवी असते. टीम इंडियाला २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेचा अजून एक सामना बाकी आहे, जो आज (२७ जुलै) खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर अनेक खेळाडू टी-२० मालिका खेळण्यासाठी त्रिनिदादला पोहोचले आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, अव्वल खान. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
*केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात राहणं फिटनेसवर अवलंबून आहे.