

Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 11व्या दिवशी, भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा भालाफेकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरज मंगळवारी भालाफेकच्या पात्रता फेरीत दिसला. त्याने पहिला थ्रो 89.34 मीटर टाकला. हा नीरजचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ठरला. शिवाय पात्रता फेरीत त्याच्यापुढे कोणताही स्पर्धक नव्हता.
नीरजचा प्रतिस्पर्धी ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.63 मीटर तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.59 मीटर फेक करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
हेही वाचा – ‘चौथा नंबर नको, पदक हवं, मागितले ते सर्व दिलं’, लक्ष्य सेनवर भडकले प्रकाश पादुकोण, म्हणाले…
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनेही 50 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानची ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकी हिचा 3-2 असा पराभव केला. सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आहे.
NEERAJ CHOPRA – 89.34m 🔥🔥
— Johns. (@CricCrazyJohns) August 6, 2024
– Once in a generation, He is born to win for India. pic.twitter.com/it4ETP5JQg
भारत-जर्मनी हॉकी सेमीफायनल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात पुरुष हॉकीचा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 10.30 वाजता सुरू होईल. भारतीय संघ जिंकल्यास 44 वर्षांनंतर ऑलिम्पिक हॉकीची अंतिम फेरी गाठेल. 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारत शेवटचा अंतिम सामना खेळला होता.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!