

NZ vs IND 2nd T20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२० नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला १९२ धावांचे आव्हान दिले. सूर्यकुमार यादवने सेंच्युरी ठोकली तर टिम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली.
भारताचा डाव
इशान किशन आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. किशनने ५ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. तर पंत ६ घावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही (१३) जास्त काही करू शकला नाही. मुंबईकर सूर्यकुमार यादवने जबरदस्त खेळी करत भारताची धावसंख्या वाढवली. त्याने ४९ चेंडूत शतक ठोकले. १९व्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केलेच सोबत लॉकी फर्ग्युसनला २२ धावा चोपल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली. त्याने हार्दिक पंडया (१३) आणि दीपक हुडा (०) आणि वॉशिंग्टन सुंदर (०) यांना बाद केले. भारताने २० षटकात ६ बाद १९१ धावा केल्या. सूर्यकुमारने ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १११ धावा ठोकल्या.
Hundred by #SuryakumarYadav in just 49 balls.
Another impeccable knock by Sky. #INDvsNZ pic.twitter.com/6Ez6txVt2u
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) November 20, 2022
TAKE A BOW! 🙌
Suryakumar Yadav brings up his second T20I hundred 💥
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺 pic.twitter.com/nfullD65Ww
— ICC (@ICC) November 20, 2022
हेही वाचा – हिवाळ्यात गाजराचा ज्यूस नक्की प्या..! जाणून घ्या त्याचे ५ फायदे
T20 hat-trick number two for Tim Southee! 😍 #NZvIND #CricketNation pic.twitter.com/p17wtD2228
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 20, 2022
दोन्ही संघांची Playing 11
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कप्तान), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.
भारत : इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.