NZ vs IND 2nd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! ‘हे’ दोघेजण भारताच्या Playing 11 मधून बाहेर

WhatsApp Group

NZ vs IND 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमधील बे ओव्हल येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. युझवेंद्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्टच्या जागी अॅडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. पहिला टी-२० सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. न्यूझीलंड दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

दोन्ही संघांची Playing 11

न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कप्तान), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.

भारत : इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा – Video : दोन चोरट्यांनी अवघ्या ५० सेकंदात लुटली बँक..! बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये लंपास

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० सामना : १८ नोव्हेंबर, वेलिंग्टन
  • दुसरा टी-२० सामना : २० नोव्हेंबर, माउंट मौनगानुई
  • तिसरा टी-२० सामना : २२ नोव्हेंबर, नेपियर
Leave a comment