NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! भारतीय संघातून वॉशिंग्टन सुंदर बाहेर

WhatsApp Group

NZ vs IND 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपियरमध्ये भिडत आहेत. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी, माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल पार्क येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान टिम साऊदीने टॉ़स जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ टी-20 मालिका आपल्या नावावर करू इच्छितो. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन वैयक्तिक कारणांमुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळणार नाही. त्यांच्या जागी मार्क चॅपमनचा समावेश करण्यात आला आहे. पंड्याने प्लेइंग-११ मध्ये बदल केला आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसन, शुबमन गिल आणि उमरान मलिक यांना पुन्हा संधी मिळाली नाही. मागील सामन्यात सॅमसन न खेळल्याने चाहते संतप्त झाले होते.

हेही वाचा – HanuMan Teaser : ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर रिलीज…! VFX नं जिंकली नेटकऱ्यांची मनं; पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11

भारत : इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कप्तान), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउदी (कप्तान), लॉकी फर्ग्युसन.

Leave a comment