NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंडला ४४० वोल्टचा धक्का.! तिसऱ्या मॅचपूर्वी मिळाली ‘बॅड’ न्यूज

WhatsApp Group

NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंड क्रिकेट संघाला भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन नेपियरमध्ये खेळल्या जाणार्‍या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बाहेर पडला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी (२२ नोव्हेंबर) नेपियर येथील मॅक्लीन पार्क येथे खेळवला जाईल. यजमान किवी संघ मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी कर्णधाराची बाहेर पडणे त्याच्यासाठी मोठा धक्का आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. पूर्व नियोजित वैद्यकीय भेटीमुळे केन विल्यमसन नेपियर टी-२० मध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी फलंदाज मार्क चॅपमन न्यूझीलंड संघात सामील होणार आहे. या सामन्यात टीम साऊदी कर्णधार असेल.

हेही वाचा – पुणे-बंगळुरू हायवेवर भीषण अपघात..! एकामागोमाग ४८ गाड्या धडकल्या

अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीने माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात हॅटट्रिक घेतली. केन विल्यमसन बुधवारी एकदिवसीय संघात सामील होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) ईडन पार्कवर खेळवला जाईल.

Leave a comment