PAK vs BAN : सलग चार पराभवानंतर पाकिस्तानचा विजय, बांगलादेश स्पर्धेबाहेर!

WhatsApp Group

PAK vs BAN World Cup 2023 In Marathi : भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने पुनरागमन केले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने सलग 4 सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानचा संघ 6 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पराभवामुळे बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा संघ 45 षटकांत 204 धावांवर सर्वबाद झाला. आणि पाकिस्तानला 205 धावांचे लक्ष्य दिले. महमुदुल्लाहने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 70 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याचवेळी लिटन दास 45 आणि कर्णधार शाकिब अल हसन 43 धावांवर बाद झाले. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.

हेही वाचा – भारत-दक्षिण आफ्रिका मॅचपूर्वी एकाला अटक! ‘इतक्या’ किमतीला विकत होता तिकीटे

प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 32.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. अब्दुल्ला शफीकने अर्धशतकी खेळी खेळली. त्याने 69 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. त्याचवेळी फखर जमानने 74 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 81 धावा केल्या. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझने सर्वाधिक 3 बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, उसामा मीर, मोहम्मद वसीम, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, तौहिद ह्रदोय, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment