Pak vs Eng : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी..! पाकिस्तानची गेली लाज; २२ वर्षांनी घडलंय ‘असं’!

WhatsApp Group

Pak vs Eng 2nd Test : मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला आहे. इंग्लंडने ३ कसोटी मालिका २-० ने जिंकली आहे. मुलतान येथे पाकिस्तान मजबूत स्थितीत होता परंतु कसोटीच्या चौथ्या दिवशी असे काही आश्चर्यकारक घडले की इंग्लंडने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि काही वेळातच सामना जिंकला. शेवटी हा सामना पाकिस्तानने २७ धावांनी गमावला आणि इंग्लंडने मालिका जिंकली. रावळपिंडीत खेळवण्यात आलेला पहिला सामना इंग्लंडने ७४ धावांनी जिंकला होता. इंग्लंडने पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर २२ वर्षांनी हे घडले आहे, त्याआधी २०००/०१ मध्ये इंग्लंडने १-०ने मालिका जिंकली होती.

अशी रंगली मुलतान कसोटी

पहिल्या कसोटीत जिथे एकीकडे भरपूर धावा पाहायला मिळाल्या, तर दुसरीकडे या सामन्यात असे काहीही पाहायला मिळाले नाही. बेन डकेट आणि ऑली पोप यांच्या अर्धशतकांसह इंग्लंडने पहिल्या डावात २८१ धावा केल्या. येथे पाकिस्तानच्या अबरार अहमदने पहिल्या डावात ७ विकेट घेत इंग्लंडला गुडघे टेकले.

पण प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २०२ धावांवर ऑलआऊट झाला, सौद शकील वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला कमाल दाखवता आली नाही. पहिल्या डावात इंग्लंडच्या जॅक लीचने चार विकेट घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
दुसऱ्या डावात इंग्लंडने २७५ धावा केल्या, या डावात हॅरी ब्रूकचे शानदार शतक (१०९) इंग्लंडच्या कामी आले आणि त्याने मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या डावातही बेन डकेटने ७९ धावांची अप्रतिम खेळी केली. दुसऱ्या डावाच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला ३५५ धावांचे लक्ष्य दिले होते, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडे जवळपास अडीच दिवसांचा अवधी होता.

हेही वाचा – ३ ते ७ लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ १० टॉप कार; मायलेजही आहे दमदार!

पाकिस्तानसमोर ३५५ धावांचे लक्ष्य होते आणि अडीच दिवस बाकी असताना त्यांनी दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. पण हळूहळू असे काही घडले की इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात अब्दुल्ला शफीकने ४५ धावांची खेळी केली, कर्णधार बाबर आझम केवळ १ धावा करून पुन्हा बाद झाला. दुसऱ्या डावातही सौद शफीक उपयुक्त ठरला आणि त्याने ९४ धावांची खेळी खेळली आणि एक टोक धरून पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. सौदला इमाम-उल-हकने साथ दिली ज्याने ६० धावांची खेळी केली. प्रथम इमाम-सौदची शतकी भागीदारी आणि नंतर सौद-नवाझची ८० धावांची भागीदारी यांनी पाकिस्तानला बळ दिले. पण या भागीदारी व्यतिरिक्त एकही फलंदाज पाकिस्तानसाठी टिकू शकला नाही, दुसऱ्या डावात मार्क वुडने इंग्लंडसाठी चमत्कार घडवून आणला, ज्याने ४ बळी घेतले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर..

हा पराभव पाकिस्तानसाठी जखम देणारा आहे. कारण पाकिस्तानने स्वत:च्या घरात सलग ३ कसोटी सामने गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाकडून एक सामना गमावला होता, आता इंग्लंडकडून सलग दोन सामने हरले आहेत. यापूर्वी १९५९ मध्ये ही घटना घडली होती. या मालिकेतील पराभवामुळे पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत तो सहाव्या स्थानावर आहे. तर इंग्लंड विजयासह पाचव्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानावर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment