

Marco Jansen Mohammed Rizwan fight : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (PAK vs SA) यांच्यात चालू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 26 व्या सामन्यात भांडण पाहायला मिळाले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन एकमेकांशी भिडले. प्रकरण इतके वाढले की, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने आहेत.
पाकिस्तानच्या डावाच्या सातव्या षटकात प्रोटीज संघाचा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर इमाम उल हकाला बाद केले. इमाम बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान क्रीजवर आला. जानसेनच्या पहिल्याच चेंडूवर रिझवान थोडक्यात बचावला. रिझवानने फुल लेंथचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पुढच्या चेंडूने रिजवानच्या बॅटची कड घेतली आणि चौकार गेला. यानंतर जानसेनचा संयम सुटला आणि तो रिझवानशी भांडला. यानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून बाबर आझम आणि पंचांनी प्रकरण शांत केले.
हेही वाचा – सोशल मीडियावर करू नका ‘या’ चुका, रिलेशनशिपवर होतो परिणाम
पाकिस्तानचा डाव
या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि सौद शकील यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर शादाब खानने 43 धावा केल्या. या खेळीमुळे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 46.4 षटकात सर्वबाद 270 धावा केल्या. स्टार वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने दोन्ही सलामीवीरांसह 3 तर शम्सीने 4 बळी घेतले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!