World Cup 2023 : पाकिस्तानी खेळाडूंची तब्येत बिघडली, अनेकांना ताप!

WhatsApp Group

World Cup 2023 : बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध विश्वचषकातील तिसरा सामना खेळला. आता त्यांना आपला पुढचा म्हणजेच चौथा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे, मात्र त्याआधीच संघातील काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे. काही खेळाडूंना व्हायरल फिव्हरचा (Pakistan Players Viral Fever) त्रास होत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ बंगळुरूला पोहोचला आहे. ‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार, बंगळुरूचे हवामान पाकिस्तानी खेळाडूंना अनुकूल नव्हते. आज सकाळी संघाच्या ऑप्शनल नेट सेशनमध्ये वसीम ज्युनियर पूर्ण तीव्रतेने गोलंदाजी करताना दिसला, पण या सरावात संघाचे अनेक प्रमुख खेळाडू उपस्थित नव्हते. अहवालानुसार, संघाचे पुढील नेट सेशन संध्याकाळी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होते, ज्यामध्ये बहुतेक खेळाडूंनी भाग न घेतल्याची माहिती आहे. म्हणजे सराव सत्र रद्द झाले.

पाकिस्तानसाठी शतक झळकावणारा स्टार सलामीवीर अब्दुल्ला शफीकची सध्या प्रकृती ठीक नाही. दरम्यान, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी तापातून बरा झाला आहे. याशिवाय संघातील इतरही अनेक खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा – अकाऊंटमध्ये बॅलन्स पाहून कामगार हँग, 2 अब्ज 21 करोड रुपये!

पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोन जिंकले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बाबर सेनेने नेदरलँड्सचा पराभव केला होता. यानंतर वनडे विश्वचषकाच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. मात्र, यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan Cricket Team News)

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment