पाकिस्तानी बॉक्सरचे लज्जास्पद कृत्य, महिलेच्या पर्समधून पैसे चोरले आणि पळ काढला!

WhatsApp Group

Pakistani Boxer Zohaib Rasheed Steals Money | दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान आपल्या काही कामांमुळे नेहमी चर्चेत असतो. दहशतवाद हाही त्यांच्यासाठी मोठा मुद्दा आहे. पाकिस्तानी लोकही जगभरात आपल्या देशाची प्रतिमा डागाळण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, एका पाकिस्तानी बॉक्सरने इटलीमध्ये एक लज्जास्पद कृत्य केले आहे. जोहेब रशीद असे या बॉक्सरचे नाव आहे, जो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळण्यासाठी 5 सदस्यीय पाकिस्तानी संघासह इटलीला पोहोचला होता.

मात्र यादरम्यान जोहेबने त्याची महिला सहकारी लॉरा इकरामच्या पर्समधून पैसे चोरले आणि तेथून पळ काढला. पाकिस्तान हौशी बॉक्सिंग फेडरेशनने 5 मार्च रोजी ही माहिती दिली. पीटीआयने पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, त्यांनी इटलीतील पाकिस्तानी दूतावासाला या घटनेची माहिती दिली. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव कर्नल नसीर अहमद म्हणाले, ”जोहेब रशीद ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळण्यासाठी पाच सदस्यीय पाकिस्तानी संघासह इटलीला पोहोचला होता. मात्र तो ज्या प्रकारे वागला आहे, ते फेडरेशन आणि देशासाठी लज्जास्पद आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे, मात्र तो कोणाच्याही संपर्कात नाही.”

हेही वाचा – शेतकऱ्यांनो सरकारकडे काही मागू नका, कोणाचे सरकार आणायचे ते ठरवा – नाना पाटेकर

महिला बॉक्सर लॉरा इकराम प्रशिक्षणासाठी गेली असताना ही घटना घडल्याचे अहमद म्हणाले. दरम्यान, रिसेप्शनमधून जोहेब रशीदने त्यांच्या खोलीच्या चाव्या काढून त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले विदेशी चलन चोरून नेले. या घटनेनंतर जोहेब हॉटेलमधून गायब झाला. सध्या त्याचाही शोध सुरू आहे. जोहेब रशीदला पाकिस्तानी बॉक्सिंगचा उगवता स्टार मानला जात होता. गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment