पथुम निसांकाचे तुफान..! वनडेमध्ये ‘डबल हंड्रेड’ मारणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज

WhatsApp Group

श्रीलंकेचा क्रिकेटर पथुम निसांकाने इतिहास रचला आहे. निसांकाने शनिवारी (9 फेब्रुवारी) पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद 210 धावा केल्या. निसांकाने 139 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि आठ षटकार मारले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा निसांका हा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे.

याआधी श्रीलंकेसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च डाव खेळण्याचा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने 2000 मध्ये शारजाच्या मैदानावर भारताविरुद्ध 189 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजेच निसांकाने जयसूर्याचा 24 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे.

25 वर्षांचा पथुम निसांका हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील दहावा फलंदाज आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल यांनी ही कामगिरी केली आहे. विदेशी फलंदाजांमध्ये निसांका व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), फखर जमान (पाकिस्तान), मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) आणि ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) यांनी हे स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – “त्याला क्रिकेटर बनवलं नसतं, तर बरं झालं असतं…” जडेजाच्या वडिलांचा धक्कादायक इंटरव्यू!

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक

200 * सचिन तेंडुलकर, 2010
219 वीरेंद्र सेहवाग, 2011
209 रोहित शर्मा, 2013
264 रोहित शर्मा, 2014
215 ख्रिस गेल, 2015
237* मार्टिन गुप्टिल, 2015
208 * रोहित शर्मा, 2017
210* फखर जमान, 2018
210 इशान किशन, 2022
208 शुभमन गिल, 2023
201* ग्लेन मॅक्सवेल, 2023
210* पथुम निसांका, 2024

पथुम निसांकाने केवळ 136 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याच्या बाबतीत निसांका तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल सारखे दिग्गज देखील या बाबतीत निसांका मागे आहेत. सर्वात वेगवान द्विशतक झळकावण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे, ज्याने 2022 साली बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. ग्लेन मॅक्सवेल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment