PKL : भर स्टेडियममध्ये अभिषेक बच्चननं ऐश्वर्याला ‘असं’ खेचलं, की झाला ट्रोल! पाहा व्हायरल Video

WhatsApp Group

Abhishek Bachchan Pulled Wife Aishwarya Rai In PKL : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्याचा कबड्डी संघ जयपूर पिंक पँथर्सने प्रो-कबड्डी लीग ट्रॉफी जिंकली आहे. अभिषेकने पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्यासोबत अंतिम सामना पाहिला. या जोडप्याचा विजय साजरा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमध्ये असे काही झाले आहे, की ज्यासाठी अभिषेकवर जोरदार टीका होत आहे.

अभिषेक बच्चन का झाला ट्रोल?

सोशल मीडियावर अभिषेक बच्चनला ट्रोल केले जात आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अभिषेक बच्चन अंतिम सामना जिंकल्यानंतर खूप उत्साहित झाला. या उत्साहात त्यांनी शेजारी उभी असलेली पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांना ओढून मिठी मारली. अभिषेकने अतिउत्साहीत होऊन पत्नीला अशा प्रकारे मिठी मारणे लोकांना आवडत नव्हते. अभिषेकची टीम पिंक पँथर्सने सामना जिंकताच अभिषेकने पत्नीचा टी-शर्ट खेचून तिला आपल्याकडे ओढले. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चनही नंतर तिचा टी-शर्ट खाली करताना दिसली.

हेही वाचा – Video : टीम इंडियानं बांगलादेशला हरवून जिंकला टी-२० वर्ल्डकप..! पाहा विनिंग मोमेंट

बच्चन कुटुंबाचा हा सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. जिथे लोक अभिषेकला त्याच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत आहेत. त्याच वेळी, ट्रोलर्स देखील त्यांचे काम करण्यास मागे हटले नाहीत. काहींनी पत्नीला मिठीत घेण्यासाठी खेचल्याची टीका केली, तर काहींनी ऐश्वर्या आणि आराध्यावर कमेंट करताना दिसले.

पुणेरी पलटनचा स्वप्नभंग

अभिषेक बच्चनने प्रो कबड्डी लीगच्या फायनलचे फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत. त्याने आपल्या संघाचा अभिमान असल्याबद्दल लिहिले. अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलाचा अभिमान असल्याची पोस्ट लिहिली आहे. प्रो कबड्डी लीग सीझन ९ च्या अंतिम सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटण संघाचा ३३-२९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. जयपूर संघाचे हे दुसरे पीकेएल विजेतेपद आहे. याआधी जयपूरने पीकेएलच्या पहिल्या सत्रात यू मुंबाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment