वैभव सुर्यवंशीसह दोघांची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, नागपूरच्या पठ्ठ्याची आयपीएलमध्ये डरकाळी!   

WhatsApp Group

Praful Hinge : सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने आपल्या जादुई स्पेलने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. गेल्या सामन्यात प्लेईंग-11 मध्ये नाव असूनही मैदानात उतरण्याची संधी न मिळालेल्या प्रफुलने या सामन्यात कसर भरून काढली. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ 12 चेंडूंमध्ये 4 बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

विचित्र पदार्पण आणि ऐतिहासिक पुनरागमन

प्रफुल हिंगेसाठी गेल्या आठवडा एखाद्या चित्रपटासारखा राहिला. 11 एप्रिल रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कर्णधार ईशान किशनने टॉसच्या वेळी प्रफुल पदार्पण करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, रणनितीनुसार हैदराबादने प्रफुलला मैदानावर न उतरवता ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून जयदेव उनादकटला पुन्हा बोलावले. त्यामुळे प्लेईंग-11 मध्ये असूनही प्रफुलला मैदानात उतरता आले नव्हते. मात्र, सोमवारी राजस्थानविरुद्ध त्याला खऱ्या अर्थाने संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले.

पहिल्याच षटकात ३ बळी: आयपीएलमधील जागतिक विक्रम

प्रफुल हिंगेने आपल्या गोलंदाजीने मैदानात अक्षरशः ‘कार्नेज’ (धुमाकूळ) माजवला. आयपीएलच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात 3 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांना शून्यावर बाद करून राजस्थानची अवस्था 5 बाद 9 धावा अशी दयनीय केली.

कोण आहे प्रफुल हिंगे?

नागपूरमध्ये 18 जानेवारी 2002 रोजी जन्मलेल्या प्रफुलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याने विदर्भाच्या स्थानिक क्रिकेटमधून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. मध्यम-वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपल्या अचूक टप्प्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 10 प्रथम श्रेणी सामन्यात 27 विकेट्स आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५ बळी त्याच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे, आपली धार वाढवण्यासाठी तो 2012 पासून चेन्नईतील प्रसिद्ध ‘MRF पेस फाउंडेशन’ मध्ये प्रशिक्षण घेत आहे. तसेच, ब्रिस्बेनमध्ये 15 दिवसांच्या विशेष कॅम्पसाठीही तो जाऊन आला आहे.

३० लाखांची बोली ठरली फायदेशीर

आयपीएल 2026च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात सामील केले होते. प्रफुल हा ‘हिट-द-डेक’ गोलंदाज म्हणून ओळखला जातो, जो खेळपट्टीवरून चेंडूला उसळी देण्यात माहीर आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सनरायझर्सच्या संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment