Chess World Cup 2023 : प्रज्ञानानंदचा फायनलमध्ये पराभव, 90 लाखांचे बक्षीस हुकले!

WhatsApp Group

Chess World Cup 2023 : बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रमेशबाबू प्रज्ञानानंदचा पराभव झाला आहे. 18 वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची अंतिम फेरीत नॉर्वेजियन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनशी लढत झाली. येथे त्याला कार्लसनच्या हातून पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन दिवसांत दोन्ही खेळाडूंमध्ये अंतिम सामना रंगला. पहिल्या दिवशी दोन्ही सामने अनिर्णित राहिले. त्यानंतर 24 ऑगस्टला चॅम्पियनचा निकाल टायब्रेकरद्वारे लागला.

टायब्रेकर सामन्यात कार्लसनला पहिला गेम जिंकण्यात यश आले. त्याचवेळी प्रज्ञानानंदला दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याची संधी होती, मात्र येथे तो हुकला आणि टायब्रेकरचा दुसरा सामना अनिर्णित राहिला. यासह चॅम्पियनही निश्चित झाला. कार्लसनने बुद्धिबळ विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा – स्मोकिंग करणाऱ्यांनो सावधान, नाहीतर जिभेवर येतील केस! वाचा या आजाराबद्दल…

अंतिम फेरीपूर्वी प्रज्ञानानंदने उपांत्य फेरीच्या लढतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फॅबियानो कारुआनाचा पराभव करून येथे मजल मारली होती. उपांत्य फेरीत त्याने कारुआनाचा 3-5 आणि 2-5 असा पराभव केला. युवा खेळाडूसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला. दोन सामन्यांची क्लासिकल मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यानंतर प्रज्ञानानंदने अमेरिकन ग्रँडमास्टरचा टायब्रेकरमध्ये पराभव केला.

कार्लसनला बक्षीस

बुद्धिबळ विश्वचषक 2023 विजेत्या कार्लसनने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. विजेता खेळाडू म्हणून त्याला आता एक लाख 10 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस म्हणून मिळणार आहेत. जर आपण या भारतीय रुपयात पाहिले तर ते अंदाजे 90,93,551 रुपये आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment