

RCB Bengaluru Stampede Case : बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ४ जून रोजी झालेल्या मोठ्या चेंगराचेंगरीप्रकरणी आता RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायमूर्ती जॉन मायकेल डी कुन्हा यांच्या अहवालावर आधारित कारवाईस कर्नाटक मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, यावरून मोठे विधी कदम उचलले जाणार आहेत.
११ मृत्यू, अनेक जखमी – जबाबदार कोण?
४ जूनला चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी जमली होती. यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. ही मिरवणूक RCB ने ३ जून रोजी आयपीएल जेतेपद मिळविल्यानंतर आयोजित केली होती. मात्र या कार्यक्रमासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नव्हती, असा ठपका सरकारच्या तपास अहवालात ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा – सचिन तेंडुलकरचं होतं ‘अफेअर’? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा!
RCB, KSCA आणि DNA नेटवर्क अडचणीत
कर्नाटकचे कायदामंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले की, RCB बरोबरच कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क आणि KSCA या संस्थांवरही कारवाई होणार आहे. मंत्रिमंडळाने डी कुन्हा आयोगाचा रिपोर्ट मान्य केल्यानंतर आता या संस्थांवर फौजदारी खटले दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.
सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणाही चर्चेत
या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती, तसेच गर्दी नियंत्रणासाठी यंत्रणा अपुरी पडली होती, हेही रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते, यामुळे यामध्ये राजकीय पातळीवरील जबाबदारीचाही तपास होण्याची शक्यता आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!