Saurabh Netravalkar In RCB : यूएसएचा सौरभ नेत्रावलकर पुढील वर्षी आरसीबीकडून खेळणार?

WhatsApp Group

Saurabh Netravalkar In RCB : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये यूएसएच्या सौरभ नेत्रावलकरबद्दल बरीच चर्चा आहे. त्याने आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ते पाहून प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी सौरभ नेत्रावलकरला आयपीएलच्या आगामी हंगामात खेळण्याचे संकेत दिले आहेत. अँडी फ्लॉवर म्हणाले की, टी-20 विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांच्या नजरा सौरभ नेत्रावलकरकडे लागल्या आहेत.

सौरभ नेत्रावळकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना बाद करून खळबळ उडवून दिली होती. ग्रुप स्टेजमध्ये नेत्रावलकरची कामगिरी चांगली होती. त्याने अनेक बड्या खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. यानंतर त्याने सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात नेत्रावलकरने 4 षटकात अवघ्या 21 धावा देत 2 विकेट घेतल्या, तर प्रत्येक गोलंदाजाला चांगलाच फटका बसला.

हेही वाचा – ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, आजपासून काढू शकणार नाहीत पैसे; रद्द केलं लायसन्स!

“आयपीएलमध्ये सौरभ नेत्रावलकरला मोठी मागणी”

सौरभ नेत्रावलकरची गोलंदाजी पाहून आता तो आयपीएलच्या पुढच्या सत्रातही खेळताना दिसणार का अशी चर्चा आहे. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी तसे संकेत दिले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणात ते म्हणाले, “‘फ्रँचायझी क्रिकेटसाठी सौरभ नेत्रावलकरची मागणी आता लक्षणीय वाढणार आहे. मी त्याच्यासोबत इंटरनॅशनल लीग टी-20 मध्ये काम केले आहे आणि मला त्याचा खूप आनंद झाला. सौरभ हा अतिशय हुशार गोलंदाज असून त्याच्याकडे उत्कृष्ट कौशल्यही आहे. त्यामुळे लोक नक्कीच त्याच्याकडे बघतील यात शंका नाही. त्याच्याकडे डाव्या हाताचा स्विंग आहे आणि तो डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. तो परदेशी खेळाडू म्हणून अमेरिकेत येऊन आयपीएलमध्ये उजव्या हाताच्या भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.”

आरसीबीमध्ये नेहमीच चांगल्या गोलंदाजांची कमतरता राहिली आहे आणि म्हणूनच सौरभ नेत्रावलकर त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment