IPL 2024 : दिनेश कार्तिकने ठोकला यंदाच्या आयपीएलचा सर्वात मोठा षटकार! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 RCB vs SRH Dinesh Karthik : आयपीएलच्या या मोसमात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आपल्या स्फोटक फलंदाजीची शैली कायम ठेवत उद्ध्वस्त केले. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, हैदराबादने ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि इतर फलंदाजांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 287 धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर हेनरिक क्लासेनही मागे राहिला नाही आणि त्याने षटकारांचा पाऊस पाडत मोसमातील सर्वात मोठा षटकार ठोकला. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही आणि पुढील डावात आरसीबीच्या दिनेश कार्तिकने हा विक्रम मोडीत काढला.

गेल्या वर्षी क्लॉसेनने बंगळुरूविरुद्ध 104 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती, पण तरीही त्याचा संघ हरला. यावेळी क्लासेनला शतक झळकावता आले नाही, पण त्याने आणखी एक उत्कृष्ट खेळी करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी 8.1 षटकात 108 धावा जोडल्यानंतर क्रीजवर आलेल्या क्लॉसनने येताच षटकार मारण्यास सुरुवात केली.

क्लासेनने या डावात एकूण 7 षटकार मारले आणि यातील एक षटकार थेट चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावर गेला. या मोसमात पहिला सामना खेळणारा आरसीबीचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन त्याचा बळी ठरला. या सामन्यात आधीच अनेक षटकार मारणारा फर्ग्युसन 17 व्या षटकात गोलंदाजीला परतला आणि दुसऱ्याच चेंडूवर क्लासनने लाँग ऑनच्या दिशेने उंच शॉट खेळला.

हेही वाचा – 287-3…सनरायझर्स हैदराबादची आयपीएल इतिहासातील विक्रमी धावसंख्या!

क्लासेनचा हा षटकार एकूण 106 मीटर अंतरावर पडला, जो या मोसमातील संयुक्त सर्वात लांब षटकार ठरला. क्लासेनपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचे निकोलस पूरन आणि कोलकाता नाईट रायडर्सचे व्यंकटेश अय्यर यांनीही 106 मीटरचे षटकार ठोकले होते.

कार्तिकने अल्पावधीतच हा विक्रम मोडला

मात्र, क्लासेनचा हा विक्रम याच सामन्यात मोडेल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल, पण तसे घडले आणि हा अप्रतिम पराक्रम दिनेश कार्तिकने केला. 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूला वेगवान फलंदाजी आणि चौकारांची गरज होती. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसनेही त्याला साथ दिली, पण हे दोघे बाद झाल्यानंतर डाव गडगडू लागला.

इकडे दिनेश कार्तिक आला आणि काही चेंडूंची वाट पाहिल्यानंतर त्याने फक्त चौकार-षटकारांचीच मालिका सुरू केली. कार्तिकने एकापाठोपाठ एक षटकार ठोकले आणि त्यानंतर 16व्या षटकात क्लासेनचा विक्रम मोडला. टी नटराजनच्या षटकातील पहिलाच चेंडू कार्तिकने हुक केला आणि चेंडू थेट डीप फाइन लेग बाऊंड्रीबाहेर स्टेडियमच्या छतावर आदळला. हा षटकार 108 मीटर लांब असल्याचे सिद्ध झाले आणि अशा प्रकारे कार्तिकने क्लासेनचा विक्रम मोडला. कार्तिकनेही 35 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. आरसीबीला 20 षटकात 7 बाद 262 धावांपर्यंत जाता आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment