287-3…सनरायझर्स हैदराबादची आयपीएल इतिहासातील विक्रमी धावसंख्या!

WhatsApp Group

IPL 2024 RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड नोंदवला आहे. यात हैदराबादचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने मोठे योगदान दिले. त्याने आरसीबीविरुद्ध शानदार शतक झळकावले. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 287 धावांचे विशाल आव्हान उभारले. हेडने आरसीबीच्या कमकुवत गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला.मैदानावर येताच त्याने जबरदस्त फलंदाजी सुरू केली आणि प्रत्येक दिशेने फटके मारले. त्याच्या आयपीएल क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक ठरले.

या सामन्यात हेडने 41 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 102 धावा केल्या आणि ही त्याची लीगमधील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. या सामन्यात हेडने 39 चेंडूत शतक झळकावले आणि आयपीएलमध्ये हैदराबादसाठी सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. 13व्या षटकात हेडला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. अभिषेक शर्मा 34 धावा काढून बाद झाला. हेनरिक क्लासेनने आक्रमक 2 चौकार आणि 7 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. 17व्या षटकात क्लासेनला फर्ग्युसनने बाद केले. त्यानंतर एडन मार्कराम (नाबाद 32) आणि अब्दुल समद (नाबाद 37) यांनी फटकेबाजी करत संघाला स्पर्धेतील विक्रमी धावसंख्येकडेने नेले. 20 षटकात हैदराबादने 3 बाद 287 धावा केल्या.

हेही वाचा – या झाडाची पाने, फळे, साल चमत्कारी; फूल अतिशय दुर्मिळ; 5 आजारांवर गुणकारी!

या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये हैदराबादने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही केली. हैदराबादने 22 षटकार मारले. त्यांनी आरसीबीचाच 21 षटकारांचा विक्रम मोडित काढला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या

  • 287/3 SRH vs RCB, बंगळुरू 2024
  • 277/3 SRH vs MI, हैदराबाद 2024
  • 272/7 KKR vs DC, वायझॅग 2024
  • 263/5 RCB vs PWI, बंगळुरू 2013
  • 257/7 LSG vs PK, मोहाली 2023

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक (चेंडूंनुसार)

  • 30 – ख्रिस गेल
  • 37 – युसूफ पठाण
  • 38 – डेव्हिड मिलर
  • 39 – ट्रॅव्हिस हेड
  • 42 – ॲडम गिलख्रिस्ट
  • 42 – एबी डिव्हिलियर्स
  • 45 – सनथ जयसूर्या

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment