Video : पायाला सूज, रक्त, वेदना…तरीही ऋषभ पंत लंगडत मैदानात, मग जे घडलं ते…

WhatsApp Group

Rishabh Pant Injury Update : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत पुन्हा एकदा आपल्या जिद्दीच्या जोरावर चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तो गंभीर दुखापतीनंतरही मैदानात फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स याच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना पंतच्या उजव्या पायावर चेंडू लागला होता. त्यामुळे पंत ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्याचा पाय सूजलेला होता आणि रक्तस्रावही होत होता. गुरुवारी मैदानात उतरतानाही त्याने आपल्या जखमी पायाला आधार देण्यासाठी “मून बूट” (संरक्षणात्मक ऑर्थोपेडिक बूट) घातले होते.

शार्दुल बाद होताच पंत मैदानात, प्रेक्षकांची जोरदार दाद

दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर बाद होताच पंत फलंदाजीसाठी आला आणि साऱ्या मैदानात “ऋषभ पंत”च्या नावाचा जल्लोष उसळला. शार्दुलनेही मैदान सोडण्याआधी पंतची जिद्द पाहून त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप दिली.

BCCI ने एक्सवर पोस्ट करत सांगितलं की, “ऋषभ पंत उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात यष्टीरक्षण करणार नाही. त्याऐवजी ध्रुव जुरेल विकेटकीपरची भूमिका पार पाडतील. मात्र पंत गरजेप्रमाणे फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.”

हेही वाचा – बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी RCBवर खटला; कर्नाटक क्रिकेट असोसिएशनही अडचणीत!

पंतची दुखापत गंभीर? मेटाटार्सल हाडं तुटल्याचा संशय

PTI च्या वृत्तानुसार, BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, “पंतच्या पायातील मेटाटार्सल हाडं (टाच आणि बोटांमधील लांब हाडं) तुटल्याची शंका आहे. ही परिस्थिती गंभीर वाटते.”

भारताला लागोपाठ दुखापतींचा फटका

पंतव्यतिरिक्त भारताच्या संघात इतर खेळाडूही दुखापतींनी त्रस्त आहेत. नीतीश कुमार रेड्डी घोट्याच्या दुखापतीमुळे आधीच बाहेर पडला आहे, तर आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांना देखील कमर आणि बोट दुखापतींमुळे विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या अनुपस्थितीत ईशान किशन किंवा के.एल. राहुल यापैकी एकाला यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment