वर्ल्डकप येऊ दे बाप्पा..! सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला रोहित शर्मा; पाहा PHOTO

WhatsApp Group

Rohit Sharma In Siddhivinayak Temple : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. बुधवारी बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी टीम इंडिया १४ खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. जसप्रीत बुमाह दुखापतीमुळे विश्वचषक संघाबाहेर आहे. जसप्रीत बुमराहच्या बदलीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बुधवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसला. रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह आणि त्यांची मुलगी समायराही सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. रोहित आपली मुलगी खांद्यावर घेऊन जात असल्याचे फोटोत दिसत आहे. मंदिरात पूजा करतानाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना साहित्यातील नोबेल जाहीर..! वाचा त्यांच्याबद्दल..

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment