Sachin Tendulkar 50th Birthday : सचिन तेंडुलकर ‘असा’ सेलिब्रेट करतोय 50वा वाढदिवस?

WhatsApp Group

Sachin Tendulkar 50th Birthday : क्रिकेट इतिहासातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत एक मेसेजही दिला आहे. वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरच्या ट्विटर हँडलवरून दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये सचिन रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे आणि चहाचा आनंद घेत आहे.

“टी टाइम – 50 नॉट ऑउट”, असे सचिनने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्यये म्हटले आहे. आजही फलंदाजी विश्वातील सर्व मोठे विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. वनडे, कसोटीत सर्वाधिक धावा करणे असो किंवा सर्वाधिक शतके ठोकणे असो, कोणताही फलंदाज त्याच्या जवळ जाऊ शकलेला नाही. सध्या तरी असा एकही खेळाडू नाही जो जवळपास 23 वर्षे क्रिकेट खेळू शकेल आणि त्याच्या विक्रमाच्या जवळ येऊ शकेल.

हेही वाचा – अंजीर शेतीतून कमावला 10 लाखांचा नफा! कोरोनामध्ये नोकरी गेली आणि…

आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन तेंडुलकर कुटुंबासह गोव्यात पोहोचला आहे. त्यांच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरही विमानतळावर दिसली. कडक सुरक्षेने वेढलेला सचिन विमानतळावर भरधाव वेगाने चालताना दिसला. त्याचवेळी अंजलीही चाहत्यांची गर्दी टाळताना दिसली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सचिन तेंडुलकर पुन्हा कधीही टीम इंडियामध्ये सहभागी झाला नाही. आयपीएल दरम्यान सचिन मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच मैदानावर पोहोचतो. अलीकडेच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या वतीने आयपीएलमध्ये पदार्पण केले.

 

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment