सायना नेहवालचा धक्कादायक निर्णय! पती कश्यपपासून विभक्त होण्याची घोषणा

WhatsApp Group

Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आपला पती पारुपल्ली कश्यपशी विभक्त होण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दोघेही मागील सात वर्षांपासून विवाहबद्ध होते.

सायना म्हणाली…

सायनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “जीवन कधी कधी वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. बराच विचार करून, मी आणि पारुपल्ली कश्यपने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शांतता, वैयक्तिक विकास आणि उपचार निवडतो आहोत. आम्ही एकत्र घालवलेल्या आठवणींसाठी मी आभारी आहे. आमच्या गोपनीयतेचा सन्मान करा.”

२०१८ मध्ये लग्न

२०१८ मध्ये दोघांची विवाहबंधनात येण्यापूर्वी, सायना आणि कश्यप दोघांनीही हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद अकादमीत एकत्र प्रशिक्षण घेतले होते. सायनाने ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकून आणि जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचून इतिहास रचला. तर कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि टॉप १० पुरुष खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

सायना आणि कश्यप यांची १४ डिसेंबर २०१८ रोजी विवाह सोहळा पार पडला होता. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी आज वेगळ्या वाटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment