देशातील क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा, शार्दुल ठाकुरला बनवलं कॅप्टन!

WhatsApp Group

Ranji Trophy Mumbai Captain : भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आगामी रणजी ट्रॉफी हंगामापूर्वी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता भारताचा आक्रमक ऑलराउंडर शार्दुल ठाकुर याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व दिले जाणार आहे. या निर्णयामुळे फक्त मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देशातील क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रहाणेचा राजीनामा

रहाणेने स्वतः एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. “मुंबईसाठी कॅप्टन्सी करणे आणि चॅम्पियनशिप जिंकणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. आता वेळ आहे की संघाला नवीन कर्णधार मिळावा. मात्र, एक खेळाडू म्हणून मी संघाचा भाग राहीन,” असे रहाणेने नमूद केले.

हेही वाचा – सगळे म्हणत होते ‘गजनी’ पहिला 100 कोटींचा सिनेमा… पण खरी गोष्ट वेगळीच आहे!

रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने 2023-24 च्या हंगामात तब्बल सात वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. एवढंच नाही, तर 2024-25 च्या हंगामात त्यांनी ईराणी ट्रॉफी देखील जिंकली होती. त्यांनी त्या हंगामात 14 डावांमध्ये एक शतक व एक अर्धशतक झळकावत 467 धावा केल्या होत्या.

शार्दुल ठाकुर – मुंबईच्या भविष्यातील आधारस्तंभ

शार्दुल ठाकुरच्या कर्णधारपदावर निवडीची शक्यता पूर्वीपासूनच होती, विशेषतः जेव्हा त्याला दलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोनचा कर्णधार नेमण्यात आले. मुंबईची सिनियर निवड समिती आधीच रहाणेशी चर्चा करून संभाव्य पुढील कर्णधारांबाबत मत घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

2023-24 मध्ये शार्दुलचे रणजीतील घवघवीत प्रदर्शन:

  • 9 सामन्यांत घेतले 35 बळी
  • फलंदाजीत नोंदवले 505 धावा
  •  यामध्ये एक शानदार शतकही सामील

शार्दुलने केवळ गोलंदाज म्हणून नव्हे, तर खालच्या फळीतील फिनिशर म्हणूनदेखील मुंबईला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. अशा अष्टपैलू खेळाडूकडे नेतृत्व देणे ही मुंबई संघाची भविष्यकालीन रणनीती असल्याचे जाणवते.

श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव का नाहीत कर्णधार?

मुंबई संघात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असतानाही शार्दुलकडे नेतृत्व देण्यात आले यावर अनेक चर्चांचे वारे वाहत आहेत. यामागील कारण म्हणजे नियमित उपस्थिती, अष्टपैलू कामगिरी आणि आघाडीच्या नेतृत्वगुणांची पारख. अय्यर आणि सूर्यकुमार बऱ्याचदा टीम इंडिया आणि आयपीएमुळे अनुपस्थित असतात, त्यामुळे पूर्ण हंगामासाठी विश्वासार्ह कप्तान म्हणून शार्दुल ठाकुर योग्य मानला जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment