शुबमन गिलचा ‘लहानपणीचा हिरो’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

WhatsApp Group

Indian Cricketer Retires : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू गुरकीरत सिंग मानने (Gurkeerat Singh Mann) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मोहाली येथील रहिवासी असलेल्या गुरकीरतने 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. यासोबतच तो आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांमध्ये खेळला आहे. भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी करण्यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 10 षटकेही टाकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला पदार्पण करता आले नाही. भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिलने गुरकीरतला आपला लहानपणीचा हिरो म्हणत शुभेच्छा दिल्या आहे.

निवृत्तीच्या घोषणेनंतर गुरकीरत सिंगने फोनवरील संभाषणात सांगितले की, पाठदुखीमुळे मागील आयपीएल हंगाम आणि संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळू शकलो नाही. मला असे वाटले की माझे शरीर सहकार्य करत नाही. विश्रांती घेतल्यानंतर मी क्रिकेट क्षेत्रातील इतर पर्यायांचा शोध घेईन. भविष्यात तो परदेशी लीगमध्येही खेळू शकतो, असेही त्याने सांगितले. त्याचबरोबर तो म्हणाला की, भारतातील प्रत्येक युवा खेळाडूचे भारतीय संघाचा भाग बनण्याचे स्वप्न असते. मलाही संधी मिळाली. यासाठी मी बीसीसीआय आणि पीसीएचा ऋणी राहीन.

हेही वाचा – 28 एप्रिलला पूर्व परीक्षा…! MPSC च्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

गुरकीरत म्हणाला, ”मी पंजाब क्रिकेट असोसिएशनशी 20 वर्षांपासून संबंधित आहे. मी PCA अंडर-15 राज्यातून करिअरला सुरुवात केली. यानंतर, 2011 मध्ये, देशांतर्गत हंगामात चांगल्या फलंदाजीमुळे पंजाबने सीके नायडू ट्रॉफी जिंकली. 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले.”

2021-22 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये गुरकीरत हा पंजाबचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. 2022 मध्ये जेतेपद जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा तो भाग होता. 41 आयपीएल सामन्यात 121 च्या स्ट्राईक रेटने 511 धावा केल्या. गुरकीरत म्हणाला की, सध्याच्या पंजाब संघातील खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आता तरुणांना संधी देण्याची वेळ आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment