स्मृती मंधानाला थांबवणं कठीण..! वेस्ट इंडिजला घाम फोडत वर्ल्ड रेकॉर्ड

WhatsApp Group

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, ज्यामध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी टीम इंडियाने एक आणि वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना उत्कृष्ट बॅटिंग फॉर्ममध्ये आहे. स्मृतीने तिसऱ्या टी-20 सामन्यातही 50+ धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

डीवाय पाटीलवर रंगत असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्यूजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. स्मृतीने सलामीला येत चांगली फलंदाजी केली आणि सामन्यात 13 चौकार आणि एका षटकारासह 77 धावांची खेळी केली. मिताली राजनंतर सलग 3 अर्धशतके करणारी स्मृती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आंतरराष्ट्री टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणारी ती पहिला महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

सामन्याबद्दल….

स्मृती मंधानाची जबरदस्त सुरुवात आणि तिला जेमिमाह रॉड्रिग्जने दिलेली साथ तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन गेली. स्मृतीच्या 77 धावांव्यतिरिक्त जेमिमाहने 39 धावा केल्या. त्यानंतर मैदानात रिचा घोषचे वादळ घोंगावले. तिने 21 चेंडूत 3 चौकार आणि 5 जबरदस्त षटकारांसह 54 धावांची वादळी खेळी केली. राघवी बिश्त 31 धावांवर नाबाद होती. भारताने 20 षटकात 4 बाद 217 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment