

गौतम गंभीर आणि शांताकुमारन श्रीशांत यांच्यातील भांडण वाढतच चालले आहे. लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत या दोन खेळाडूंमध्ये (Gautam Gambhir Sreeshant Fight) बाचाबाची झाली. यानंतर श्रीशांतने एक आरोप केला. गंभीर मला फिक्सर म्हणत होता, असे श्रीशांतने सांगितले. भारतातील अनेक शहरांमध्ये लेजेंड्स क्रिकेट लीग (LLC) आयोजित केली जात आहे. क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणारे अनेक माजी क्रिकेटपटू यात खेळत आहेत.
या स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात 6 नोव्हेंबरला सामना खेळला गेला होता. इंडियन कॅपिटल्सच्या डावात गुजरातसाठी श्रीशांत दुसरे षटक टाकायला आला. गंभीरने त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढचा चेंडू श्रीशांतने निर्धाव टाकला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. मात्र, सहकारी खेळाडू आणि पंच यांनी मिळून प्रकरण शांत केले.
हेही वाचा – गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल Gemini AI खास का?
यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत गौतम गंभीरवर मोठा आरोप केला आहे. श्रीशांतच्या मते, “गौतम गंभीर मला फिक्सर-फिक्सर म्हणत राहिला. पंचांसमोरही तो मला फिक्सर म्हणत राहिला. मी तेथून निघून गेल्यावरही तो तोच शब्द वापरत राहिला. मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द वापरला नाही. अनेक लोकांसोबत तो हे करत आला आहे. कदाचित गौतम गंभीरला त्याच्या सर्व मित्रांशी भांडण्याची सवय असेल. मला तशी सवय नाही. मी फक्त त्याला विचारत होतो की काय झाले, पण तो वारंवार मी ज्या गोष्टीतून बाहेर आलो आहे त्याचा उल्लेख करत होता. मी पूर्ण सन्मानाने प्रथम श्रेणी खेळून परत आलो आहे. कदाचित गौतीभाईंनी नाश्ता केला नसावा, म्हणूनच हे घडले असावे.”
सामन्यानंतर श्रीसंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही अपलोड केला, ज्यामध्ये त्याने गौतम गंभीरला ‘मिस्टर फायटर’ म्हणत आपला राग व्यक्त केला. तो म्हणाला, “मिस्टर फायटरसोबत जे घडले त्याबद्दल मला फक्त माझी बाजू स्पष्ट करायची होती. तो नेहमी त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी विनाकारण भांडतो. तो वीरू भाईसह त्याच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचा आदर करत नाही आज नेमके हेच घडले. तो मला पुन्हा पुन्हा भडकवत होता. तो माझ्याशी अशाच गोष्टी बोलत राहिला, ज्या अतिशय अशोभनीय होत्या. गौतम गंभीरने असे बोलायला नको होते.”
श्रीशांतच्या व्हिडिओ मेसेजनंतर गौतम गंभीरनेही एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!