

T20 World Cup 2022 IND vs NED Rohit Sharma Record : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आज नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात नवी उंची गाठली आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये, भारतीय संघ आज त्यांच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना करत आहे. कर्णधार रोहित शर्माने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला आणि उपकर्णधार केएल राहुल लवकर बाद झाला. मात्र यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी पदभार स्वीकारून संघाला पुढे नेण्याचे काम केले. पहिल्या धक्क्यातून सावरलेल्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला मजबूत करण्याचे काम केले. यादरम्यान रोहित शर्मानेही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली होती. टी-२० विश्वचषकात त्याच्या नावावर ३३ षटकार आहेत. आता रोहित शर्माच्या षटकारांची संख्या ३४ वर गेली आहे. म्हणजेच तो भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. आता युवराज सिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर २४ षटकार आहेत.
हेही वाचा – ‘राम नाम सत्य है’ म्हणताच तिरडी हलू लागली आणि मग पुढं…!
FIFTY for #TeamIndia Captain @ImRo45 👏👏
This is his 29th half-century in T20Is.
Live – https://t.co/GVdXQKGVh3 #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/WA1OnIh5ct
— BCCI (@BCCI) October 27, 2022
Rohit Sharma becomes the highest six hitter in T20 World Cup for India.#INDvsNED
— Manav Yadav (@ManavLive) October 27, 2022
तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे, ज्याच्या नावावर १६ षटकार आहेत. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार (६३) ठोकले आहेत.