IND vs PAK : रोहित शर्मा घाबरला, जेव्हा ‘तो’ बॉलिंग टाकायला आला..! पाहा Video

WhatsApp Group

T20 World Cup 2022 : रविवारी (२३ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात टी-२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसह अनेक फलंदाजांनी नेट्समध्ये घाम गाळला. यावेळी रोहितने कार्तिकचे जोरदार कौतुक केले. टीम इंडियाच्या गोलंदाजाचीही त्याला भीती वाटत होती.

रोहित पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी खास तयारी करत आहे. त्याने मोहम्मद शमीच्या चेंडूंचा सामना केला. यादरम्यान शमीने गोलंदाजी करण्यापूर्वी एक धोकादायक गोलंदाज येत असल्याचे सांगितले. त्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. शनिवारी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी नेट्समध्ये सराव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू उपस्थित होते. बीसीसीआयने सराव सत्राचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – Diwali 2022 : दिवाळीच्या तारखेचं कन्फ्यूजन? जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment