

T20 World Cup 2022 IND vs ZIM Suryakumar Yadav : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर-१२ च्या ग्रुप-२ मधील सामना मेलबर्नच्या ग्राऊंडवर रंगत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर केएल राहुलचे अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीमुळे भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या आहेत.
सूर्याची तुफानी खेळी!
भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा (१५) आणि विराट कोहली (२६) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. राहुलने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या, पण तो शतकापूर्वी बाद झाला. त्यानंतर मैदानावर सूर्यकुमार यादवचे तुफान आले. त्याने फक्त २५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६१ धावा केल्या. टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम स्ट्राइक रेटच्या बाबतीत सूर्याने (१९३.९६ ) पहिले स्थान पटकावले आहे.
.@surya_14kumar set the stage on fire with a cracking 61* off 25 deliveries and is our Top Performer from the first innings of the #INDvZIM clash. 👍 👍
This is also his 3rd FIFTY of the #T20WorldCup
A summary of his batting display 🔽 pic.twitter.com/2s5x9f6ldW
— BCCI (@BCCI) November 6, 2022
हेही वाचा – Andheri Bypoll Election Result 2022 : ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रभर…”
What a Player Surya kumar Yadav Into the SKY. with 193.96 Strike Rate He is here to rule! 🔥#INDvsZIM #T20WorldCup #SuryakumarYadav pic.twitter.com/GBZ7lZWTO1
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) November 6, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
झिम्बाब्वे – वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (कप्तान), रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.