

T20 World Cup 2022 India vs Western Australia 2nd Warm-Up Match : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मिशन टी-२० वर्ल्डकपला शानदार सुरुवात केली. पहिल्या अनौपचारिक सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. पण आज त्याच संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनौपचारिक सराव सामन्यात टीम इंडियाला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. या सलग दुसऱ्या सराव सामन्यात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही. तर पहिल्या सामन्यातून बाहेर पडलेल्या केएल राहुलने या सामन्यात कर्णधारपद भूषवले. रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून खेळला असला तरी त्याची फलंदाजी आली नाही.
या सामन्यात भारतीय संघाला १६९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने एक विकेट गमावून केवळ २९ धावा केल्या. ऋषभ पंत पुन्हा एकदा सलामीला अपयशी ठरला. त्याने केवळ ११ चेंडूत ९ धावा केल्या. दीपक हुडा (६), हार्दिक पंड्या (१७), दिनेश कार्तिक (१०) अपयशी ठरले. केएल राहुलने ५५ चेंडूत ७४ धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
That's that from the practice match against Western Australia.
They win by 36 runs.
KL Rahul 74 (55) pic.twitter.com/5bunUUqZiH
— BCCI (@BCCI) October 13, 2022
हेही वाचा – T20 World Cup 2022 : वर्ल्डकपमध्ये भारत कुणाकुणाशी भिडणार? इथं वाचा…
भारताचे दोन अधिकृत सराव सामने
यानंतर भारतीय संघाला दोन अधिकृत सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.
सराव सामन्यात भारताची प्लेइंग-11
रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.