AFG vs IND : सुपर-8 मध्येही भारताची ‘सुप्रीम’ सुरुवात, अफगाणिस्तानला 47 धावांनी लोळवलं!

WhatsApp Group

AFG vs IND : भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयाचा सिलसिला सुरु ठेवला आहे. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगगाणिस्तानला 47 धावांनी हरवले. स्पर्धेत अफगाणिस्तान चांगल्या लयीत खेळत आहे, पण त्यांना टीम इंडियाने थांबवले. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या भारताने 20 षटकात 8 बाद 181 धावा केल्या. पण हे आव्हान अफगाणिस्तानला जड गेले. 20 षटकात 134 धावांवर अफगाणिस्तानचा संघ ऑलआऊट झाला.

सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली. सूर्याने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. तर हार्दिकने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 32 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि कप्तान राशिद खान यांनी 3-3 विकेट्स काढल्या.

अफगाणिस्तानला हे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी भेदक मारा केला. दोघांनी 3-3 विकेट्स काढल्या. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने 2 आणि रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झाद्रान, हजरतुल्ला झाझई, गुलबदिन नैब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment