BREAKING NEWS….! भारताने जिंकला टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवलं!

WhatsApp Group

Team India Win T20 World Cup 2024 : भारत पुन्हा एकदा क्रिकेटचा विश्वविजेता बनला आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टी-20 वर्ल्डकप 2024 ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा चोकर्सचा टॅग हटवण्याचा प्रयत्न फसला. या स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नाही. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने एकही सामना न गमावता ट्रॉफी जिंकली आहे.

भारताचा चौथा विश्वचषक

भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनीच्या टीमने भारताला या फॉरमॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकही जिंकला आहे. पहिल्यांदा 1983 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2011 मध्ये. आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले तर भारताला तब्बल 11 वर्षांनंतर ही ट्रॉफी मिळाली आहे.

बार्बाडोस येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावून 176 धावा केल्या. विराट कोहलीने भारचाकडून सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला 169 धावांवर रोखून ट्रॉफी जिंकली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. हार्दिक पांड्याने या षटकात आफ्रिकन संघाला केवळ 8 धावाच करू दिल्या.

भारताने आवळला सामना…

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिच क्लासेनने सर्वाधिक 52 धावांची वादळी खेळी केली. त्याने 2 चौकार आणि 5 षटकार ठोकले. क्विंटन डी कॉकने 39 धावा केल्या. एका वेळी आफ्रिकेला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. पण जसप्रीत बुमराहने 18व्या षटकात एक विकेट काढत 2 धावा दिल्या. 19वे षटक अर्शदीप सिंहने टाकले, त्याने 4 धावा दिल्या. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जबरदस्त झेल टिपला आणि आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या. विराट कोहलीला सामनावीर आणि जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment