World Cup 2023 : 27 खेळाडू वर्ल्डकपमधून बाद! BCCI चा अजित आगरकरला आदेश

WhatsApp Group

World Cup 2023 : टीम इंडियासाठी आगामी वनडे वर्ल्डकप महत्त्वाचा आहे. भारतीय संघ 2011 पासून म्हणजे 12 वर्षांपासून विश्वचषक जिंकू शकलेला नाही. यंदा वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला स्पर्धेचा मोठा दावेदार म्हटले जात आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला होता.

2019 च्या विश्वचषकानंतर टीम इंडियाने 47 खेळाडूंना वनडेमध्ये संधी दिली. त्याचबरोबर आता विश्वचषकासाठी 20 खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करण्याची चर्चा आहे. म्हणजे 27 खेळाडू बाद होतील. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बीसीसीआय चीफ सिलेक्टर अजित आगरकरला वेस्ट इंडिजला पाठवत आहे. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीदरम्यान तो तेथे उपस्थित राहणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 27 जुलैपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसह अजित आगरकर विश्वचषकासाठी 20 खेळाडूंची निवड करणार आहे. रोहितपासून द्रविडपर्यंत मुख्य खेळाडूंबाबत तयारी पूर्ण केली आहे. यात जसप्रीत बुमराहपासून ते केएल राहुल, श्रेयस अय्यरपर्यंत दुखापतग्रस्त खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा – कारच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी? जाणून घ्या एअर प्रेशरबाबत!

विश्वचषकानंतर 9 खेळाडूंना फक्त एक वनडे खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये ऋतुराज गायकवाड, राहुल चहर, शिवम दुबे, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, रवी बिश्नोई, चेतन साकारिया, कुलदीप सेन आणि जयंद यादव यांचा समावेश आहे. तर 2-2 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 खेळाडूंवर प्रयत्न केले गेले. यामध्ये आर अश्विन, टी. नटराजन आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे.

गेल्या 4 वर्षात विराट कोहलीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 38 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 1612 धावा केल्या आहेत. नाबाद 166 धावांची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दुसरीकडे शिखर धवन ३७ वनडे खेळल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र आता तो संघाबाहेर आहे. या कालावधीत धवनने 41 च्या सरासरीने 1313 धावा केल्या. 12 अर्धशतकं ठोकली. 98 धावा ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

गेल्या 4 वर्षात गोलंदाज म्हणून कुलदीप यादवने सर्वाधिक 30 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर अष्टपैलू शार्दुल ठाकूरलाही ३० सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. या काळात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप 41 आणि शार्दुल 44 बळी घेण्यात यशस्वी ठरला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment